अयोध्येतील राम मंदिरातील रामललांची मूर्ती बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारल्याची माहिती समोर आली आहे. व्हिसा नाकारण्याचे कारण अमेरिकेने सांगितलेले नाही. अरुण योगीराज २० दिवसांच्या दौऱ्यावर अमेरिकेला जाणार होते. मात्र, या प्रकरणी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
Bangladesh : शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेश अंधारात बुडाला; गौतम अदानींचं आहे कनेक्शन
प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. व्हर्जिनियातील रिचमंड येथे असोसिएशन ऑफ कन्नड कुटास ऑफ अमेरिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी योगीराज यांनी दोन महिन्यांपूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. पण, १० ऑगस्ट रोजी कोणतेही कारण न सांगता त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.
नेमकं कारण काय?
शिल्पकार अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. अमेरिकेने व्हिसा नाकारण्याचे कारण अजूनही सांगितलेले नाही.
शिल्पकार अरुण योगीराज यांना असोसिएशन ऑफ कन्नड कुटस ऑफ अमेरिकाद्वारे आयोजित जागतिक कन्नड परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत व्हर्जिनियातील ग्रेटर रिचमंड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. कन्नड संस्कृती आणि वारसा साजरा करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
अरुण योगीराज यांना व्हिसा न मिळाल्याने आयोजकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. योगीराज यांचे कुटुंबीय त्यांच्या पत्नी या परिषदेसाठी आधीच अमेरिकेत आहेत. व्हिसा न मिळाल्याने त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. योगीराज याआधीही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय सहभागी झाल्याचे कुटुंबीयांचे सांगितले.