अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 12:13 PM2024-06-02T12:13:01+5:302024-06-02T12:13:39+5:30

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकाल समोर आले आहेत.

arunachal pradesh and sikkim assembly election results Ajit Pawar's Nationalist Congress is leading in three seats in Arunachal Pradesh | अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. विधानसभेच्या ६० जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. तर ३२ जागांच्या सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा क्लीन स्वीपकडे वाटचाल करत आहे. १९ एप्रिल रोजी दोन्ही राज्यांमध्ये मतदान झाले होते. सिक्कीममध्ये एकूण ७९.८८ टक्के मतदान झाले, तर अरुणाचल प्रदेशमध्ये ८२.९५ टक्के मतदान झाले.

"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप

सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि पवन कुमार चामलिंग यांच्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट  यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सिक्कीममध्ये भाजप आणि काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. १४६ उमेदवारांपैकी प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय, माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि भाजपचे नरेंद्र कुमार सुब्बा यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये, प्रेम सिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील SKM ने १७ जागा जिंकल्या, तर SDF ने १५ जागा जिंकल्या.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा डंका

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. दरम्यान, आता अरुणाचलमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार विजयी होत असल्याचे दिसत आहे. 

अरुणाचल प्रदेशात भाजप बहुमताच्या जवळ जात आहे. पक्षाने आतापर्यंत २३ जागा जिंकल्या असून २३ जागांवर आघाडीवर आहेत. एनपीईपीने १ जागा जिंकली आहे तर अपक्ष उमेदवाराने १ जागा जिंकली आहे. 

भाजपाने आतापर्यंत १८ जागा जिंकल्या असून २८ जागांवर आघाडीवर आहे. एकूणच, आतापर्यंत ६० पैकी ५८ जागांचे कल आणि निकाल आले असून भाजपने ४६ जागांवर आपली पकड कायम ठेवली आहे.

"मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कधी शपथ घेणार याची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु ६ जूननंतरच होईल, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे निकालही समोर असतील, असं अरुणाचल प्रदेश भाजपचे प्रवक्ते तेची नेचा म्हणाले.

Web Title: arunachal pradesh and sikkim assembly election results Ajit Pawar's Nationalist Congress is leading in three seats in Arunachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.