शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग, भारताचं चीनला प्रत्युत्तर

By admin | Published: April 20, 2017 8:58 PM

चीनकडून अरुणाचल प्रदेशमधल्या सहा ठिकाणांची नावं बदलल्यानंतर भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - चीनकडून अरुणाचल प्रदेशमधल्या सहा ठिकाणांची नावं बदलल्यानंतर भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नाव बदलल्यानं खरी परिस्थिती बदलत नसते, असा उपरोधिक टोला भारतानं चीनला लगावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, असंही भारतानं चीनला ठणकावलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं की, चीन सरकारशी आतापर्यंत कोणतीही बातचीत झाली नाही. दोन्ही देशांतील सीमेचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वेगवेगळी व्यवस्था बनवण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देशांसाठी यथोचित तोडगा निघेल. तर दुसरीकडे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यानंतर भडकलेल्या चीननं भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांची नावं बदलली आहेत. तसेच चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रकल्पाच्या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण मिळाल्यास आम्ही त्याचा विचार करू, असंही गोपाल बागले यांनी सांगितलं आहे. चीननं पहिल्यांदाच मानकीकृत अधिकारांनी अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचं नामकरण केलं आहे. चीनच्या मंत्रालयानं 14 एप्रिलला याची घोषणा केली होती. त्यांनी चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट आणि रोमन वर्णांनुसार मानकीकृत केलं होतं. या सहा ठिकाणांचं वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्‍युका, बुमो ला आणि नामकापुब री असं रोमन वर्णांनुसार नामकरण केलं होते. भारत ज्या भूभागाला "अरुणाचल प्रदेश" असे संबोधतो त्या "दक्षिण तिबेट" येथील सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वर्णानुसार नावे दिली आहेत", असे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिले होते. भारत-चीनदरम्यानच्या 3 हजार 488 किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून दोन्ही देशात वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून दक्षिण तिबेट संबोधले जाते.