शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग गेला वाहून

By admin | Published: July 04, 2017 2:47 PM

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे

ऑनलाइन लोकमत
ईटानगर, दि. 4 - अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी ईटानगरसहीत सोमवारी (3 जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत तर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे.  
 
जोरदार झालेल्या या पावसात नहार्लगुन आणि ईटानगरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग 415 चा मोठा भाग वाहून गेला आहे. सध्या युद्धपातळीवर या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. खबरदारी म्हणून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ईटानगर आणि नहार्लगुनला जोडणारा जुलांग रोडदेखील पावसात खचल्यानं मोठे नुकसान झालं आहे. 
 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदी किनार, भूस्खलनाच्या दृष्टीनं अति संवेदनशील परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्लाही त्यांना  देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
 
या नैसर्गिक आपत्तीचा मुख्यमंत्र्यांनी अहवाल सोपवण्यात येणार असून मदतीसाठी आवश्यक ती पाऊलं उचलली जातील, असे येथील अधिका-यांनी सांगितले आहे.  दरम्यान, सगलीमध्ये अडकलेले चार रुग्ण, तीन मुलं, महिला आणि विद्यार्थ्यांसहीत 20 पेक्षा अधिक जणांना विमानाच्या सहाय्याने नहार्लगुन येथे सुखरुप पोहोचवण्यात आले.