Arvind Kejriwal Arrest: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज (21 मार्च) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केले. उद्या त्यांना पीएमपीएल कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, केजरीवालांच्या अटकेवर त्यांचे जुने सहकारी कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
कवी कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच रामचरित मानसमधील एका दोहा लिहिला आहे. जो जसे कर्म करतो, त्याला तशाप्रकारचे फळ मिळते, असा त्या दोह्याचा अर्थ आहे. या दोह्यातून त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
अरविंद केजरीवालांना अटकदिल्ली उच्च न्यायालयाने आज केजरीवालांना ED च्या कोणत्याही कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे. यानंतर काही तासातच केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना अटक केली. सध्या केजरीवालांना ईडीच्या मुख्यालयात आणण्यात आले असून, उद्या, (22 मार्च) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयात हजर केले जाईल.
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील - अतिशीकेजरीवालांच्या अटकेनंतर दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि पुढेही राहतील. अटक केल्यानंतर गरज पडल्यास ते तुरुंगातून सरकार चालवतील.