चंढीगड - गुजरात विधानसभा निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी संपूर्ण ताकतीने प्रचार करत आहेत. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही एक दावा केला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार, हे त्यांनी लेखी सांगितले आहे. केजरीवाल यांनी काँग्रेसबद्दलही भाकीत केलं. मात्र, मोठा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या उमेदवारावर डिपॉझीट जप्त होण्याची वेळ आहे.
हरयाणातील आदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार सतिंदर सिंह यांना केवळ ३४१३ मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे येथील निवडणुकीत त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. आपचेहरयाणा प्रभारी डॉ. सुशील गुप्ता यांनी पराभव स्विकारत आणखी जोमाने लोकांमध्ये जाऊ, असे म्हटले आहे. आदमपूर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार भव्य बिश्नोई हे १५ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.
काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा
'आज तक'च्या कार्यक्रमात त्यांनी एका कागदावर हिलून दिले की, काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा मिळणार आहेत. काँग्रेसला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी मारला. ते पुढे म्हणाले की, गुजरात जनतेला बदल हवा आहे. लोकांना बदल नको असता, तर आम्हाला इतका पाठिंबा मिळाला नसता. आम्हाला 30 टक्के मतदान मिळणार आहे. पंजाबमध्ये सरकार बनवले, गुजरातमध्येही तसेच होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
पंजाबमध्येही असेच भाकित
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात अरविंज केजरीवाल यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन्ही जागांवरून पराभूत होणार असल्याचे भाकित व्यक्त केल होते. पंजाबच्या निकालातही चन्नी यांनी दोन्ही जागा गमावल्या. गुजरात निवडणुकीबाबतही केजरीवाल यांनी असेच भाकित व्यक्त केले आहे.