नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या अधिकार विभागणीबाबत सुरू असलेल्या विवादाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असलेल्या दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री साध्या चपराश्याचीही बदली करू शकत नाही. हा निर्णय म्हणजे दिल्लीच्या लोकांच्या विश्वासावर झालेला अन्याय आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की,''जर अशा एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली जो आमचे म्हणणे ऐकतच नसेल तर मोहल्ला क्लीनिक कसे चालू राहील. जर कुणी या व्यक्तीने भ्रष्टाचार केला आहे, असे सांगितले तर मी काय करू? मी भाजपवाल्यांना सांगू का की या प्रकरणात लक्ष घाला म्हणून. हे सारे भाजपाकडूनच केले जात आहे. हा निर्णय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहे.''
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 2:51 PM
दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे.
ठळक मुद्देदिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली हा निर्णय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहेदिल्लीमधील सातही जागा आपच्या पारड्यात टाका, म्हणजे आम्ही संसदेत लढून दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारला भाग पाडू