Arvind Kejriwal Trolled: देशात सध्या चलनी नोटांवरील फोटोंचा मुद्दा गाजताना दिसतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीगणेशाचे फोटोही (Laxmi Ganesh photos on Indian currency notes) असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. आता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Pm Narendra Modi) लिहिलेले पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात केजरीवाल यांनी लिहिले आहे की, देशातील १३० कोटी लोकांना भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत गणेश आणि लक्ष्मीचे चित्र हवे आहे. हे पत्र (letter) अरविंद केजरीवाल यांनीही शुक्रवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. माझी मागणी म्हणजे देशातील १३० कोटी लोकांच्या भावना आहेत असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यावरून अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे हे पत्र मीडिया आणि सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागले. अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मी दिवाळीला पूजा करत असताना नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा, असे माझ्या मनात आले होते. ही १३० कोटी जनतेचीच भावना आहे. यावर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.
काही लोकांनी लिहिले आहे की- केजरीवाल त्यांची मन की बात १३० कोटी भारतीयांची इच्छा म्हणून सांगत सुटले आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी अरविंद केजरीवाल यांना १३० कोटी लोकांना नोटांवर लक्ष्मी गणेशाचा फोटो कुठे हवा आहे, हे दाखवण्याचे आव्हान केले. @AnilKum32178832 यांनी लिहिले- तुम्ही १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधी कसे झालात? फक्त दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि त्या राज्यात लोकांनी फक्त ५०% लोकांनी मतदान केले आहे, त्यामुळे एकूण ४ ते ५ कोटी लोकांचे प्रतिनिधित्व तुम्ही करू शकता. मग निवडणूक जाहीरनाम्यात गणेशजींचा फोटो लक्ष्मी छापणार असे लिहिले होते का? इतकं फेकणं (खोटं बोलणं) ठीक नाही!!
धर्माच्या नावावर राजकारण करण्यात आम आदमी पक्ष भाजपसारखाच आहे, असे काहींनी लिहिले. @gyanveerBns नावाच्या युजरने लिहिले की, गुजरात निवडणुकीपर्यंत केजरीवाल कट्टर हिंदूच राहतील. @Ramraajya नावाच्या ट्विटर हँडलवरून केजरीवाल यांनी आता सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी आणि नथुराम गोडसे यांना राष्ट्रपिता बनवण्याची मागणी करावी, असेही लिहिले. @Real_Sbshukla यांनी दिवाळीनिमित्त वृत्तपत्रांमध्ये दिल्ली सरकारच्या जाहिरातीचा फोटो शेअर करत लिहिले की, स्वतःच्या दिवाळीच्या जाहिरातीत लक्ष्मी गणेशाची आठवण का येत नाही. इतर युजर्सनीही या जाहिरातीचा फोटो शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.