Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानेशुक्रवारी केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. पण, त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यापुढे काही अटी ठेवल्या आहेत.
केजरीवालांसमोर कोणत्या अटी?
- अरविंद केजरीवालांना 50 रुपयांचा बाँड आणि तेवढीच रक्कम तुरुंग अधीक्षकांकडे जमा करावी लागेल.
- जामीन काळात केजरीवालांना त्यांच्यावरील प्रकरणाबाबत कोणतेही भाष्य करता येणार नाही.
- या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला भेटू किंवा बोलू शकणार नाहीत.
- त्यांना मुख्यमंत्री कार्यालय किंवा दिल्ली सचिवालयात जाता येणार नाहीत.
- नायब राज्यपालांची परवानगी मिळाल्यानंतरच अधिकृत फाइल्सवर स्वाक्षरी करतील.
- या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाईल पाहता येणार नाहीत.
- केजरीवालांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल.
केजरीवाल यांना कधी अटक झाली?दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी 9 समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. ते या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि मद्य व्यापाऱ्यांकडून लाच मागण्यात त्यांचा थेट सहभाग होता, असा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे.