शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

‘’अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या’’, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:23 IST

Delhi Women Protest : अरविंद केजरीवालजी आम्हाला एक हजार रुपये द्या, अशी मागणी करत शेकडो महिलांनी दिल्लीतील गुरू हरकिशन पब्लिक स्कूलसमोर आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

अरविंद केजरीवालजी आम्हाला एक हजार रुपये द्या, अशी मागणी करत शेकडो महिलांनी दिल्लीतील गुरू हरकिशन पब्लिक स्कूलसमोर आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आंदोलनकर्त्या महिला दिल्ली सरकारकडे एक हजार रुपयांची मागणी करत होत्या. तसेच हातात फलक घेऊन केजरीवालजी आम्हाला १ हजार रुपये द्या, अशी मागणी करत होत्या. 

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागण्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून घेतले होते आणि सगळ्यांना एक हजार रुपये मिळतील, असे सांगितले होते. असा दावा या महिलांनी केला. तसेच दिल्लीमधील पाणी प्रश्नाबाबतही या महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हे आंदोलन दिल्ली महिला मंचकडून करण्यात आले. आम आदमी पक्षाने २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना दिल्लीमधील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना १ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिल्ली सरकारने या योजनेला महिला सन्मान राशी योजना असे नाव दिले होते. त्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघातून आपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेतले होते. 

दरम्यान, तिहार तुरंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री लवकरच तुरुंगातून बाहेर येतील आणि ते बाहेर आल्यानंतर ही योजना लागू करतील, असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी आमदार नितीन त्यागी यांनी दिल्ली सरकारच्या महिलांना प्रत्येकी १ हजार रुपये देण्याच्या या योजनेला विरोध केला होता.  आम्ही प्रत्येक ठिकाणी एक हजार रुपयांचा फॉर्म भरून घेत आहोत, हे चुकीचं आहे. तसेच ही बाब खोटी आहे. या योजनेला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच तिला मान्यता मिळण्याचीही कुठली शक्यता नाही, अशा दावा, केजरीवाल यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४