ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. 10 - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'आम आदमी पार्टी' मोठा डाव खेळत असल्याचे दिसत आहे. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबमधील 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष सिसोदिया यांनी मोहालीतील सभेदरम्यान हा दावा केला आहे.
सिसोदिया सभेतील भाषणादरम्यान म्हणाले की, 'तुम्ही असं समजा की पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच बनणार आहेत. पंजाबचा मुख्यमंत्री कुणीही होवो, तरी जी आश्वासनं दिली जात आहेत ती पूर्ण करणं केजरीवाल यांची जबाबदारी आहे.' 'तुम्ही अरविंद केजरीवाल यांना मत देत आहात असं समजून मतदान करा', असेही पुढे सिसोदिया म्हणाले आहेत.
मनीष सिसोदिया यांनी केलेल्या या विधानावरुन 'आम आदमी पार्टी' पंजाब विधानसभा निवडणुकीच्या लढाईत केजरीवाल यांचे नाव वापरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर दुसरीकडे, आगामी काळात केजरीवाल राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद खरंच सोडणार आहेत का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Ye samajh ke vote do ki aap Arvind Kejriwal ko vote de rahe ho. Aapka vote Kejriwal ke naam pe hai: Manish Sisodia in Mohali (Punjab)— ANI (@ANI_news) 10 January 2017