Arvind Kejriwal on Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दसऱ्याच्या दिवशी(12 ऑक्टोबर 2024) रात्री 9.30 च्या सूमारास बाबा सिद्दिकी यांची त्यांच्या ऑफिसबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि हरयाणीतील तिघांनी सिद्दिकी यांच्यावर हा गोळीबार केला. दरम्यान, या घटनेवरुन आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले केजरीवाल?"मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील लोक भयभीत झाले आहेत. त्यांनी दिल्लीतही कमी-अधिक प्रमाणात असेच वातावरण निर्माण केले आहे. या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचा आहे. आता जनतेला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागे," अशी टीका त्यांनी आपल्या पोस्टमधून केली.
गुंड इतके सक्रिय का झाले?तर, दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनीदेखील या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "मुंबईत भाजपचे सरकार आहे आणि त्यांच्याच नेत्याची हत्या होते. यावुन तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहू शकता. दिल्लीतही कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. इथेही मुंबईसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही खूप गंभीर बाबत आहे," अशी प्रतिक्रिया सौरभ यांनी दिली.
दिल्ली पोलीस मुंबई पोलिसांना तपासात मदत करणारबाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासात मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल मुंबईला जाऊ शकतो. विशेष सेलच्या सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. मुंबई पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलचे पाच जणांचे पथक मुंबईला जाऊ शकते, अशी माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गुंडांमधील परस्पर वर्चस्व असण्याची शक्यता सेलला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी घेतल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.