Punjab Election: पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्येआपचं सरकार आलं तर ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. पंबाज विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'नं आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आज पंजाबच्या चंदीगडमध्ये आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत केजरीवालांनी पंजाबच्या विकासाबाबत काही महत्वाची आश्वासनं यावेळी दिली.
"पंजाबमध्ये 'आप'ची सत्ता आली तर सत्तेच येताच आम्ही तीन महत्वाचे निर्णय घेऊ, यात पहिलं म्हणजे पंजाबमधील नागरिकांना ३०० युनीटपर्यंत मोफत वीज देऊ, त्यानंतर आजवरची थकीत वीजबिलं पूर्णपणे माफ करू आणि तिसरा निर्णय म्हणजे राज्यातील सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून देऊ", असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
"पंजाबमध्ये देशात सर्वात जास्त वीज निर्मिती होत असूनही सर्वात महाग वीज याच राज्यात आहे. खासगी कंपन्या आणि सरकारमधील साटंलोटं आता संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे. ज्यापद्धतीनं आम्ही दिल्लीतील नागरिकांना ३०० युनीटपर्यंत मोफत वीज दिली. तसंच काम पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचं सरकार करेल", असं आश्वासन केजरीवालांनी दिलं आहे.