नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग, काँग्रेस आणि पंजाबमधील अकालीचे नेते यांच्यावर सातत्याने तोफा झाडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री तब्बल १२ दिवस मौनव्रत धारण करणार आहेत. या काळात ते कोणाशी म्हणजे कोणाशीही बोलणार नाही. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांना ते स्वत:पासून दूर ठेवणार आहेत. एवढेच नव्हे, तर ते या काळात सोशल मीडियाचाही वापर करणार नसल्याने त्यांच्या चाहत्यांना, विरोधकांना आणि कार्यकर्त्यांना केजरीवाल यांचे काहीही म्हणणे कळणार नाही.अरविंद केजरीवाल यांनी ३0 जुलैपासून १२ दिवस विपश्यना करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ते नागपूरच्या विपश्यना केंद्रात जाणार आहेत. विपश्यनेच्या काळात बोलण्यास, ऐकण्यास आणि काही वाचण्यासही पूर्ण बंदी असते. त्यामुळे केजरीवाल यांना त्यांच्यावरील टीका वा आरोप वृत्तपत्रांतून वा टीव्हावीवरून वाचता वा पाहता येणार नाहीत. या काळात त्यामुळे अन्य पक्षांचे नेतेही बहुधा त्यांच्यावर टीका करणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी ३0 जुलैपासून सलग १२ दिवस विपश्यना करण्याचे ठरविले आहे, याचाच अर्थ या काळात त्यांना कोणत्याही खटल्यासाठी कोणत्याही कोर्टात जावे लागणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)केजरीवाल यांच्यापासून माझ्या जीवाला धोकासहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदारअसीम अहमद खान यांनी आपल्या जीवास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. आपणास धमक्या आल्या आहेत. त्याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीज उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे तक्रारही केली आहे, असे त्यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जीवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून धोका असल्याचे विधान केल्यानंतर लगेचच आ. खान यांनी हे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा मौनव्रत
By admin | Published: July 30, 2016 2:27 AM