नवी दिल्लीः कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, केंद्रासह अनेक राज्य सरकारे कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. कोरोना हा आज किंवा उद्या जाणारा आजार नाही. लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यामुळे राजधानीत कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, आठवड्याभरात 3500 रुग्ण वाढले आहेत. परंतु चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही. कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या हॉस्पिटलला 'कारणे दाखवा' नोटिस बजावली आहे. COVID19 च्या रुग्णांना अॅम्ब्युलन्सने कोविड हॉस्पिटलला पोहोचवणं हे रुग्णालयाचं कर्तव्य आहे. लॉकडाऊन शिथील केल्यामुळे दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. मात्र, जोवर मृत्यूदर किंवा गंभीर प्रकरणांची संख्या वाढत नाही, तोवर काळजीचं कारण नाही. दिल्लीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील मिळून 4,500 बेड्स तयार आहेत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिली आहे.
हेही वाचाCoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासाभारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊलमोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला