Arvind Kejriwal wife Sunita Video Message, Kejriwal Ko Aashirvaad दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना एक व्हिडीओ संदेश जारी केला. याआधी त्यांना दोनदा प्रसाममाध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली होती. मात्र आज त्यांनी थेट व्हिडीओ प्रसारित करून महत्त्वाची घोषणा केली. यामध्ये त्यांनी सीएम केजरीवाल यांचा जनतेने साथ द्यावी असे आवाहन केले. त्यासोबतच त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर शेअर करत 'केजरीवाल को आशीर्वाद' हे अभियान सुरु केल्याचे जाहीर केले.
सुनीता केजरीवाल म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल यांनी काल कोर्टात आपली बाजू मांडली. ते कोर्टात जे बोलले ते बोलण्यासाठी हिम्मत आणि धाडस लागतं. त्यांनी देशभक्ती कधीही सोडलेली नाही. मी गेली 30 वर्षे त्यांच्याबरोबर संसार करत आहे आणि त्यांना ओळखते आहे. त्यांच्या नसानसांमध्ये देशभक्ती भिनलेली आहे. तुम्ही देखील त्यांना साथ देऊन मुख्यमंत्री केले. कोणी त्यांना भाऊ मानले तर कोणी त्यांना मुलाप्रमाणे मानले. आता अडचणीच्या काळात त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन 'केजरीवाल को आशीर्वाद' ही मोहीम सुरू करत आहोत"
"मी तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर देत आहे. तुम्ही त्यांना साथ द्या. तुमचा संदेश 8297324624 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. आजपासून या नंबरवर तुम्ही त्यांना आशीर्वाद देऊ शकता. त्यांना आशीर्वाद देऊ शकता. अनेक लोक अरविंदजींसाठी उपवास करत आहेत. तुमच्या मनात जे येईल ते लिहा आणि पाठवा. तुमचा प्रत्येक संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. जय हिंद!", असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.