दिल्लीतील मेदांत रुग्णालयात ह्रदय विकाराच्या धक्क्याने त्यांच निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्या अंत्यसंस्कारात स्वतः केजरीवालही पोहोचले होते. बंसल आपल्या कुटुंबासह दिल्लीच्या प्रितमपुरा येथे राहात होते. त्यांच्या निधनामुळे दुःखी असलेल्या केजरीवालांचं कुटुंब मिश्रांच्या आरोपांमुळे आणखी दुखावलं. स्वतः अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी ट्विट करून आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं तसंच हा मुर्ख माणूस ज्या व्यक्तीचं आज निधन झालं आहे त्याच्यावर आरोप करत असल्याचं म्हटलं.
My brother in law is no more n this stupid man is speaking all written script without any mind.— Sunita Kejriwal (@KejriwalSunita) May 8, 2017
क्या अपनी बौखलाहट में कपिल मिश्रा इतनी भी मर्यादा भूल गये की आज ही अरविंद जी के साढ़ू बंसल जी का निधन हुआ और उन पर ऐसे बेबुनियाद आरोप?— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 8, 2017
पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर अडचणींचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहाने रविवारी पुढचा अंक गाठला होता. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या कपिल मिश्रांनी थेट केजरीवालांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कपिल मिश्रांना पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षातून निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. कपिल मिश्रा यांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे असा आरोप करत मिश्रांनी खळबळ उडवून दिली होती. केजरीवाल मंत्रिमंडळात काम करताना अनेक गैरप्रकार आढळून आले. याबाबत मी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना निवेदन दिल्याचे मिश्रांनी म्हटले होते. केजरीवाल आता पूर्वीसारखे राहिले नसून मुख्यमंत्री पदाने त्यांना बदलले आहे असे मिश्रा यांनी म्हटले होते. आपने कपिल मिश्रांचे आरोप फेटाळून लावत मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे कपिल मिश्रा यांनी रविवारीच भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले होते. सोमवारीदेखील मिश्रा यांनी आपवर निशाणा साधला होता. केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यावर मला धमक्यांचे मेसेजेस आणि कॉल येत आहेत. माझी पक्षातून हकालपट्टी करुन दाखवा असे आव्हानच त्यांनी दिले होते. मी भाजप आणि नरेंद्र मोदींचा विरोधक असून मी भाजपची भाषा बोलत असल्याच्या आरोपात तथ्य नाही असे मिश्रांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी सकाळी सीबीआयकडे तक्रार करणार असून सीबीआयसमोर प्रत्यक्ष साक्षीदारही हजर करु असे मिश्रांनी म्हटले होते.