नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पार्टीनं आपल्या उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. या निवडणुकीत आपच्या अरविंद केजरीवाल यांची कसोटी लागणार आहे. अरविंद केजरीवालांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांजवळ 3.4 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वर्षं 2015पासून या संपत्ती 1.3 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.2015मध्ये त्यांची संपत्ती 2.1 कोटी रुपये होती. केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याजवळ 2015मध्ये रोख रक्कम आणि मुदत ठेव(FD) 15 लाख रुपयांची होती. जी 2020पर्यंत वाढून 57 लाख रुपये झाली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं की, ऐच्छिक सेवानिवृत्ती (वीआरएस)च्या लाभाच्या स्वरूपात सुनीता केजरीवाल यांना 32 लाख रुपये मिळाले आहेत. एफडीमध्येही त्यांची बचत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवालांच्या संपत्तीत वाढ; प्रतिज्ञापत्रातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 9:36 AM
दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
ठळक मुद्देदिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पार्टीनं आपल्या उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. अरविंद केजरीवालांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर केलं आहे.