प्रियकरासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलेली अंजू आता परत आली आहे. अंजू भारतात परतल्यावर तिचे वडील प्रचंड संतापले. "पाकिस्तानातून ती तोंडाला काळं फासून आली आहे. आता तिचं काय करायचं हे अरविंद आणि पोलीस पाहतील. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही" असं अंजूचे वडील गयाप्रसाद थॉमस यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानातून चार महिन्यांनंतर भारतात परतलेली अंजू सध्या दिल्ली विमानतळावर आहे. वडील गयाप्रसाद यांनी तिला माझ्या घरात प्रवेश नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
'आज तक'शी बोलताना वडिलांनी सांगितलं की, "माझ्यासाठी ती ज्या दिवशी पाकिस्तानला गेली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. आता ती तिथून तोंड काळं करून परतली आहे. अशा परिस्थितीत मी तिला माझ्या घरी येऊ देणार नाही. बाकी अरविंदला माहीत असेल कारण तो तिचा नवरा आहे. त्याला जे काही करायचे असेल ते त्याने करावं. पोलिसांनीही वाट्टेल ते करावे. माझा अंजूशी काहीही संबंध नाही. ती कुठे आहे किंवा ती कुठे जात आहे याने मला काही फरक पडत नाही."
"माझा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला आहे. मी आता घरी एकटा आहे. माझीही काही दिवसांपासून तब्येत खराब आहे. मी एवढेच म्हणेन की हे प्रकरण अंजू आणि अरविंद यांच्यातील आहे. गयाप्रसाद यांना अंजूने तुमची माफी मागितली आणि घरात राहण्याची परवानगी मागितली तर काय कराल? हा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, अंजूने केलेली चूक माफीच्या लायक नाही. ती माझ्या घरी अजिबात येणार नाही एवढेच मला माहीत आहे. कारण मी त्याला आधीच सांगितले होते की माझा तिच्याशी काही संबंध नाही."
“आता अंजू तिच्या मुलांसाठी आली आहे का? या आधी तिला आपल्या मुलांची आठवण झाली नाही का? तिने आपल्या मुलांचा इतका विचार केला असता तर ती कधीच पाकिस्तानात गेली नसती. पण आता जे व्हायचं होतं ते झालं आहे. ती आमच्यासाठी मेली आहे. मुलंही तिच्याशी बोलू इच्छित नाहीत" असं अंजूच्या वडिलांनी सांगितलं आहे.
अंजू भारतात परतल्यानंतर तिने अरविंदशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचं नाव ऐकताच तो संतापला. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं. अरविंद राजस्थानमधील अलवरच्या भिवडीमध्ये राहतो. अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या भिवडी येथे राहत होती. ती टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला भेटायला गेली होती, पण नंतर ती खैबर पख्तुनख्वामध्ये राहणाऱ्या नसरुल्लाला भेटली.