ऑनलाइ लोकमतनवी दिल्ली, दि. ११ - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दुस-यांदा गव्हर्नर पदाची धुरा सांभाळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्यांचे उत्तराधकारी कोण ? यावरुन गेल्या काही दिवसांत चर्चेला उधाण आले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपदी अरविंद पानगरिया यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते. सध्याची तीन वर्षांची कारकिर्द सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त होण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी स्पष्ट केल्यानंतर आता त्यांचे उत्तराधकारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. यामध्ये विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पडेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण व अशोक चावला यांचा नावांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, आता सुत्रांच्या म्हणण्यानुसार अरविंद पानगरिया यांचे नाव समोर येत असून येत्या दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होणार अरविंद पानगरिया ?
By admin | Published: July 11, 2016 6:00 PM