Arya Rajendran : जोडी जमली रे... देशातील सर्वात तरुण महापौर करणार आमदारासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 08:48 AM2022-02-17T08:48:28+5:302022-02-17T08:49:36+5:30

आमदार सचिव देव हे कमी वयाचे आमदार असलेल्या यादीत असून ते स्टुंडंट फेडरेशन ऑफ इंडियाशीही जोडलेले आहेत. तर, आर्या या देशातील सर्वात तरुण महापौर आहेत

Arya Rajendran : The youngest mayor aryan Rajendran of the country will get married to an MLA Sachiv dev | Arya Rajendran : जोडी जमली रे... देशातील सर्वात तरुण महापौर करणार आमदारासोबत लग्न

Arya Rajendran : जोडी जमली रे... देशातील सर्वात तरुण महापौर करणार आमदारासोबत लग्न

googlenewsNext

तिरुवअनंतपूरम - जोड्या या स्वर्गातच बनतात असं म्हणतात. मात्र, या जोड्या जमायलाही एक निमित्त असतं, एक भेट असते, एक ओढ असते आणि एक निर्णय असतो. केरळच्या राजकारणात अशीच एक जोडी जमली आहे. नेहमीच राजकीय आघाडी करणाऱ्या नेत्यांनी आता आयुष्यभरासाठी आघाडी केलीय. देशातील सर्वात तरुण 23 वर्षीय महापौर आर्या राजेंद्रन यांनी बलुसेरीचे आमदार सचिव देव यांच्याशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

आमदार सचिन देव हे कमी वयाचे आमदार असलेल्या यादीत असून ते स्टुंडंट फेडरेशन ऑफ इंडियाशीही जोडलेले आहेत. तर, आर्या या देशातील सर्वात तरुण महापौर आहेत. पुढील महिन्यातच या दोघांचा विवाह होत असून बालपणीचे हे दोघे मित्र आता आयुष्याचे जीवनसाथ होणार आहेत. लहानपणापासूनच दोघेही एकमेकांना पसंत करत होते, आता त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. दरम्यान, आर्या आणि सचिन या दोघांची घट्ट मैत्री स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेतूनच झाली. आर्याचे वडिल इलेक्ट्रीशिय असून तिची आई एलआयसी एजंट बनून काम करत होत्या.

सचिन देव हे एसएफआयचे राज्य सचिव असून त्यांनी विधानसभा निवडणुकी बलुसेरी मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. सीपीएमच्या तिकिटावर 20 हजारांपेक्षा अधिक मतं घेऊन देव यांनी विजय मिळवला आहे.  

आर्या बनल्या महापौर

केरळच्या 2020 मध्ये झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत एका तरुणीने नवीन विक्रम रचला. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील २१ वर्षीय आर्या राजेंद्रन देशातील सर्वात तरुण महापौर बनल्या. आर्या राजेंद्रन यांनी तिरुअनंतपूरमच्या महापौरपदाची शपथ घेतली. या निवडीमुळे आर्या यांनी नवी मुंबईचे महापौर संजीव नाईक यांचा विक्रम मोडीत काढला होता. माकप जिल्हा व राज्य समितीने एकमताने महापौर पदासाठी तिची उमेदवारी मंजूर केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी आर्या राजेंद्रन यांना महापौरपदाची शपथ दिली. आर्या यांनी 99 पैकी 54 मते मिळवून महापौर पदासाठी विजय मिळवला. तिरुवअनंतपूरम महापालिकेतील 100 सदस्यांच्या जागांपैकी सीपीएम आणि डीएलएफ आघाडीने 51 जागांवर विजयी होत बहुमत मिळवले होते. भाजपाने 34 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले असून काँग्रेस आघाडीला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे.

 

Web Title: Arya Rajendran : The youngest mayor aryan Rajendran of the country will get married to an MLA Sachiv dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.