शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

भुकेसाठी 723 प्राण्यांची कत्तल होणार इतक्यात..., नामिबियातील प्राण्यांच्या रक्षणासाठी धावून आले अनंत अंबानी यांचे ‘वनतारा’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:35 AM

Anant Ambani: आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

नवी दिल्ली - आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

नामिबियामध्ये दुष्काळामुळे वन्यप्राणी सांभाळणे, त्यांचे रक्षण करणे हे अवघड काम बनले आहे. त्यामुळे भूक मिटवण्यासाठी तेथील सरकारने ७२३ प्राण्यांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामध्ये ३० गेंडे, ६० म्हशी, आफ्रिकेत इंपाला नावाने ओळखली जाणारी ५० काळवीटे, १०० ब्लू वाईल्टबीस्ट, ३०० झेब्रा, ८३ हत्ती, १०० इलँड यांचाही समावेश आहे. सर्व आव्हानांवर मात करून प्रत्येक प्राण्याचे संरक्षण करणे हा वनतारा फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे.

नेमके काय करतात?संकटग्रस्त वन्यजीवांची काळजी व त्यांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम गुजरातमधील वनतारा फाउंडेशन ही संस्था करते. गुजरातमधील जामनगर येथे ३५०० एकर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पांत दोन हजार तज्ज्ञांची मदत घेतली जाते. सुमारे दोन हजार प्रजातीच्या प्राण्यांचे संरक्षण व त्यांची काळजी घेण्यासाठी जामनगरमधील जागेत अतिशय आधुनिक सुविधा असलेले एक रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. याचा अनेक प्राण्यांना फायदा होत आहे.

काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध- वनतारा फाउंडेशनने म्हटले आहे की, प्राण्यांची कत्तल टाळण्यासाठी त्या प्राण्यांची त्यांच्या आयुष्यभर काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- संकटग्रस्त प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नामिबिया सरकारबरोबर काम करण्याची वनतारा फाउंडेशनची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, असेही या फाउंडेशनने म्हटले आहे.

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानी