शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

एक, दोन नाही तब्बल सात वेळा समन्स! हेमंत सोरेन ईडीसमोर झाले नाही हजर, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 1:52 PM

Jharkhand CM Hemant Soren News: केंद्रीय एजन्सीचा वापर करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jharkhand CM Hemant Soren News: एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, अरविंद केजरीवाल विपश्यना शिबिरासाठी गेले. ईडीने दोन वेळा समन्स बजावले होते. तर, दुसरीकडे एका प्रकरणात ईडीने सहावेळा समन्स बजावूनही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीसमोर हजर झाले नसल्याचे सांगितले जात आहे. ईडीने सातव्यांदा समन्स बजावत चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. 

अंमलबजावणी संचालनालयाने जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना पीएमएलए अंतर्गत सातवे समन्स जारी केले आहे. या प्रकरणी हेमंते सोरेन यांनी आपले म्हणणे मांडावे, असे ईडीने म्हटले आहे.  कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने सोरेन यांना नव्याने समन्स बजावले होते. परंतु हेमंत सोरेन चौकशासाठी उपस्थित राहिले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 

एक, दोन नाही तब्बल सात वेळा ईडीचे समन्स

ईडीने हेमंत सोरेन यांना यापूर्वी सहा वेळा समन्स बजावले. मात्र, हेमंत सोरेन एकदाही हजर झाले नाहीत. या प्रकरणी ईडीने आयएएस अधिकारी छवी रंजन यांच्यासह १४ जणांना अटक केली आहे. ईडीने समन्स जारी केल्यानंतर सोरेन म्हणाले की, केंद्रीय एजन्सीचा वापर करून आपल्या सरकारची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, झारखंडमधील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे मालकीमध्ये बदल करून जमिनी हडप केल्याचा आरोप आहे. ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आयएएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड