अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी विभागाने (एटीएस) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात छापा टाकत अमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भंडाफोड केला. या कारवाईत तब्बल १,८१४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) व ते तयार करण्यासाठीचा कच्चा माल व उपकरणे जप्त करण्यात आली. एटीएसने दोन संशयितांनाही अटक केल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.
गुजरात एटीएस व दिल्लीच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. छापा टाकण्यासाठी पथकाने नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांचा वापर केला. अटक केलेला सन्याल बने याला २०१७ मध्ये मुंबईतील आंबोली येथे मेफेड्रोन प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.
काय केले जप्त?
- ९०७ किलो मेफेड्रोन
- ५,००० किलो कच्चा माल
- ग्राइंडर, मोटर्स, काचेचे फ्लास्क, हीटर व इतर उपकरणे
- ७५ हजार चौ. फूट क्षेत्रात पसरलाय कारखाना.