काँग्रेस खासदार तथा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी (1 जुलै) सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भगवान शिव शंकरांचे चित्र दाखवले. त्यांच्या या कृत्यावर भाजप खासदार भडकले. खरे तर, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना यासंदर्भात आधीच नियम सांगितले होते. यावेळी, राहुल गांधी यांनी आपल्याला कॅमेऱ्यातून काढून टाकल्याची तक्रार सभातींकडे केली. यावर सभापतींनी त्याना एक मिनिट थांबण्यास सांगितले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवल्यावर सभापती ओम बिर्ला म्हणाले, "आपण विरोधी पक्षनेते आहात. सभागृहाची प्रतिष्ठा कायम रहावी आणि नियमांचे पालन व्हावे, अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण स्वतः शिव शंकरांना इश्वर मानता आणि अशा प्रकारे येथे त्यांचे वारंवार चित्रिकरण करणे योग्य नाही. तसेच, नियम क्रमांक 349 सांगतो की, सभागृहात झेंडा अथवा कुठलीही वस्तु प्रदर्शित करता येणार नाही.
राहुल गांधी यांनी सभागृहात दाखवला भगवान शिव शंकरांचा फोटो - यापूर्वीही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भगवान शिव शंकरांचा आपले प्रेरणास्थान असल्याचे म्हणत, त्यांचा फोटो दाखवत तो फिरवला होता. यावर सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अडवत नियमावलीच काढली होती. यानंतर, आम्ही शिवजींचा फोटोही दाखवू शकत नाही, आपण मला आडवत आहात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या अभय मुद्रेचा उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेस अभय मुद्रेत आहे. तसेच, सर्वच धर्माचा उल्लेख करत ते म्हणाले, यांच्यातही 'अभय मुद्रा' दिसते.
यासंदर्भात काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर व्हिडिओ पोस्ट करतत त्याला 'संसदेत कॅमेरा कसा चालतो, बघा जादू', असे कॅप्शन दिले आहे.
शिव शंकरांचा फोटो दाखविण्याचा अर्थ... -यावेळी राहुल गांधी म्हणाले, या सभागृहात भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवायला बंदी आहे. जर मला वाटत असेल की मला त्यांच्याकडून संरक्षण मिळते, तर तुम्ही मला रोखत आहात. याशिवाय माझ्याकडे आणखीही काही फोटो आहेत. मला सर्व फोटो दाखवण्याची इच्छा आहे. संपूर्ण हिंदुस्तानला हे फोटो माहीत आहेत. मी हा फोटो आणला, कारण या फोटोमध्ये आयडिया टू डिफेंड आहे. शिवशंकरांच्या गळ्यात सर्प आहे. याचा अर्थ कुणालाही भुऊ नये. यानंतर राहुल गांधी यांनी गुरु नानक देवांचा फोटो दाखवला आणि गदारोळ सुरू झाला.