इंफाळ : अज्ञात उडणारी वस्तू (यूएफओ) दिसल्याने इम्फाळ विमानतळावर रविवारी तीन तास गोंधळाची स्थिती होती. तीन विमानांना उतरण्यास विलंब झाला, तर दोन विमाने कोलकात्याकडे वळवण्यात आली, अशी माहिती हवाई वाहतूक नियंत्रकांनी दिली. यूएफओ दिसल्यानंतर भारतीय वायूसेनेने दोन राफेल लढाऊ विमानं यूएफओ शोधण्यासाठी पाठवली होती.
विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे तासभर आकाशात एक मोठी वस्तू उडताना दिसली. त्यानंतर इम्फाळचे हवाई क्षेत्र तातडीने बंद करण्यात आले. त्यामुळे एक हजार प्रवाशांचे हाल झाले.
नेमके काय झाले?हवाई वाहतूक नियंत्रक आणि मैदानावरील लोकांनी यूएफओ पाहिले. त्यानंतर विमानांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. इम्फाळ विमानतळाचे संचालक चिपेम्मी केशिंग यांनी यूएफओ दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.