नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच १०० टक्के वेळ पाळत आपले लक्ष्य साध्य केले आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. म्हणजेच, १ जुलै रोजी कोणतीही रेल्वे उशिरा धावली नाही किंवा उशिरा पोहोचली नाही. रेल्वे सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा बरोबर होत्या.
अर्थात, सध्या एकूण रेल्वेच्या काही प्रमाणातच रेल्वे धावत आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांवर गर्दी कमी होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीचे सर्वात चांगले रेकॉर्ड हे ९९.५४ टक्के हे २३ जूनचे होते. केंद्रीय रेल्वेमंंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी ट्विट केले की, रेल्वेच्या सेवेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.