हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत आणि इकडे नमो अॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. वाह क्या चौकीदार है!' असा टोला ओवेसी यांनी मोदींना लगावला आहे. तसेच नमो अॅपवरून टी-शर्टची विक्री होत असल्यामुळे त्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'जेट एअरवेज बुडत आहे आणि इकडे चौकीदार एसबीआयचे 1500 कोटी रूपये देत आहे. मेक इन इंडिया’च्या नावाखाली हजारो कारखाने बंद पडले आहेत. तुम्ही या छोट्या उद्योगांना कर्ज देऊ शकत नाही का?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसींनी पुलवामा हल्ल्यावेळी बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का, असा सवाल मोदींना विचारला होता. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसी मोदी सरकारवर बरसले. त्यावेळी त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर तोफ डागली होती.पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी आणि राजनाथ सिंह काय करत होते? बीफ बिर्यानी खाऊन झोपले होते का?, असे सवाल करत ओवेसींनी टीकेची झोड उठवली.
बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल
'भारतीय हवाई दलानं बालाकोटवर बॉम्ब टाकले. त्यात 250 दहशतवादी मारले गेले, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीआरपीनं त्या भागात 300 मोबाईल फोन सक्रीय असल्याची माहिती दिली होती. तुम्हाला बालाकोटमध्ये सक्रीय असलेले 300 फोन दिसतात. पण पुलवामात तुमच्या नाकाखालून आणण्यात आलेलं 50 किलो आरडीएक्स दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवेसी
तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवेसी यांना निझामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल, या भाजपाच्या टीकेला अकबरुद्दीन ओवेसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजतात का, असा सवाल ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता. आम्ही पंतप्रधानांबद्दल काहीच बोलायचं नाही का? ते स्वत:ला देव समजू लागले आहेत का?, अशा प्रश्नांचा भडिमार ओवेसी यांनी केला होता. तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवेसींना निझामासारखं हैदराबाद सोडून पळून जावं लागेल, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. 'आदित्यनाथ यांच्या विधानामागे मोदींची मानसिकता आहे. असे शब्द मोदींच्या मानसिकतेमधूनच येऊ शकतात,' असं म्हणत ओवेसींनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली होती. मोदी स्वत:ला देव समजतात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.