नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद सुरू आहे. या वादानंतर लडाखमध्ये चिनी सैन्य अखेर माघार घेतल्याच्या बातमीवर लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी यांसंदर्भात ट्विट केले आहे. चीनकडून 'डी-एस्केलेशन' प्रक्रिया सुरू करण्याचा अर्थ काय आहे? त्यांनी घुसखोरी केली नाही, तर माघार कशी घेत आहेत? असे सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानासंदर्भात त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी स्टेट काऊन्सिलर वांग यी यांच्यात फोनवर चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी परस्पर संमतीने दोन्ही देशांच्या जवानांना एलएसीमधून परत बोलावून शांतता राखण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी दिली. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी तीन प्रश्न विचारले आहेत.
१. 'डी-एस्केलेशन'चा अर्थ चीनला जे हवे आहे ते करु देणे?'
२. पंतप्रधानांच्या मते, 'कोणी घुसखोरी केली नाही, कोणी घुसखोरी केली नाही आहे, तर डी-एस्केलेशन म्हणजे काय?
३. चीनने 'डी-एस्केलेशन'वरून सहा जूनला सुद्धा सहमती दर्शवली होती. तरीही आपण चीनवर विश्वास का ठेवत आहोत?
दरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यात गेल्या दोन महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. लडाखमध्ये दोन्ही बाजूचे सैनिक मोठ्या संख्येने तैनात आहेत. ६ जूनला दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्याबद्दल एकमत झाले. मात्र, चीनने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. उलट माघारी हटण्याचे आवाहन करणाऱ्या भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. २२ जूनला दोन्ही देशांच्या सैन्यात कमांडर दर्जाची बैठकही झाली.
आणखी बातम्या...
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता
21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत