उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी (Varanasi) येथे आज ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) परिसरात सर्व्हे करण्यात आला. पहिल्या दिवसाच्या या सर्व्हेवर एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबरी (Babri) हिसकावली, पण ज्ञानवापी हिसकावू शकणार नाही. ज्ञानवापी मशीद होती आणि राहील, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. (Asaduddin Owaisi Remarks On Gyanvapi Survey)
'दुसरी मशीद कदापी गमावणार नाही' -असदुद्दीन ओवैसी म्हणाले, की मी सरकारला सांगू इच्छितो, की आम्ही एक बाबरी मशीद गमावली आहे. आता दुसरी मशीद कदापी गमावणार नाही. तुम्ही न्यायाची हत्या करून आमची मशीद हिसकावली आहे. दुसरी मशीद हिसकावू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.
'ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा आदेश असंवैधानिक' -तत्पूर्वी, ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा आदेश असंवैधानिक असून अशा प्रकारचा आदेश द्यायला नको होता. ही बाबरी मशीद पार्ट-2 ची तयारी आहे. या मागे मोठा कट आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते. एवढेच नाही, तर आम्ही आमची मशीद वाचवू. आम्ही वाचवू, या तुमच्या म्हणण्यावर, आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुम्ही वाचवणार नाही. इंशाअल्लाह यावेळी आम्हीच आमची मशीद वाचवू, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवेसी म्हणाले, मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे, की ज्ञानवापी मशीद होती, आहे आणि असेन. 1991 चा कायदा सांगतो, की 15 ऑगस्ट 1947 रोजी जी मशीद होती ती तशीच राहील. जर त्यात कुणी बदल करायचा प्रयत्न केला, तर 1991 चा संसदेचा कायदा सांगतो, की त्याच्यावर केस कार. कारागृहात पाठवा आणि न्यायालयाने निर्णय दिला तर त्याला 3 वर्षांची शिक्षा होईल.