हैदराबाद: भारतात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओवेसी म्हणाले, देशात कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच (Narendra Modi) जबाबदार आहेत. ओवेसी म्हणाले, आपण गेल्या वर्षी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले होते, त्याने काय झाले? देशातून कोरोना पळाला?'' (Asaduddin owaisi slams pm Narendra Modi for Corona surge and second wave of coronavirus)
ओवेसी म्हणाले पंतप्रधान मोदींनी रुग्णालायांतीत सुविधा का वाढविल्या नाहीत? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का? देशाच्या राजधानित ऑक्सिजन का कमी पडतोय? आपण आत्मनिर्भर भारत आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांची मदत का घेत आहोत.'
Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय
'मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची खुशबू (सुगंध) येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे. आमच्याकडे MP फंड असता, तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधी देता आली असती. मात्र, आता काहीही नाही, असे ओवेसी म्हणाले.
मोदी सरकारने पीएम केअर्स फंडातील पैसे काढून राज्य सरकारांना द्यायला हवेत. जेने करून त्यांना कोरोना लसीकरणाचा वेग वाढवता येईल, असे म्हणत, सध्या देशात कोरोना लशींच्या तुटवड्याची चर्चा सुरू आहे. असे असेल, तर यापूर्वीच फायझर कंपनीला भारतात लस लॉन्च करण्याची परवानगी का देण्यात आली नही, असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.
CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला
ओवेसी म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाही पंतप्रधानांनी रविवारी 'मन की बात'मध्ये केवळ एकदाच ऑक्सिजनचा उल्लेख का केला? माध्यमांना इशारा देताना ओवेसी म्हणाले, ''मोदींच्या माध्यम चमचांनो, जागे व्हा. आपले स्वतःचेच लोक मरत आहेत. आता तरी मोदींचा बाजा वाजविणे थांबवा.