अहमदाबाद : स्वयंघोषित संत आसाराम बापू याच्याविरुद्ध गांधीनगरच्या न्यायालयात सोमवारी आरोप निश्चित करण्यात आले. याबरोबरच आसारामविरुद्धच्या खटल्याची सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी बलात्कारप्रकरणात आसाराम आणि अन्य सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.आपण आसारामच्या आश्रमात राहात असताना त्याने आपल्यावर अनेकदा बलात्कार केला, असा आरोप सुरत येथील एका महिलेने केला होता. दुसऱ्या एका बला त्कारप्रकरणात आसाराम हा जोधपूरच्या कारागृहात असल्याने पोलिसांना त्याला गांधीनगरला आणता आले नव्हते. त्यामुळे आरोप निश्चित करण्यास विलंब झाला. (वृत्तसंस्था)
बलात्कारप्रकरणी आसाराम बापूविरुद्ध आरोप निश्चित
By admin | Published: March 29, 2016 1:12 AM