जयपूर - राजस्थानमधील जोधपूर येथील कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या आसारामला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आसारामला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या केलेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापू आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे.मंगळवारी रात्री आसाराम बापूची तब्येत अचानक बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीचा तासभर कारागृहातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे आसाराम याने गुडघ्याचा त्रास होत असल्याचे तसेच रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे तसेच अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले.आसाराम बापूला जेव्हा रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याचे काही भक्तही तिथे पोहोचले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढले. आसारामला संपूर्ण वेळ एक्स-रे रूममध्ये ठेवण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याशिवाय कार्डिओलॉजीच्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. त्याशिवाय कार्डिओलॉजी डॉक्टरलाही बोलावण्यात आले. दरम्यान, आसारामची ईसीजी रिपोर्ट सामान्य आला आहे.वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर आसारामची रवानगी महात्मा गांधी रुग्णालयातून मथुरादास माथूर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये करण्यात आली. आसाराम आजारी पडल्याचे समजताच त्याचे भक्तही मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले.
तुरुंगवासात असलेल्या आसाराम बापूची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 7:45 AM