अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 09:02 PM2018-03-30T21:02:09+5:302018-03-30T21:02:09+5:30
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे. गहलोत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे निकटवर्तीय असलेल्या जनार्दन द्विवेदी यांचे स्थान घेतील.
दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अशोक गहलोत यांना मिळालेल्या पदोन्नतीमागे काँग्रेसला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेले चांगले यश कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान गहलोत हे पक्षाचे गुजरात प्रभारी होते. गहलोत यांनी 1998 ते 2003 आणि 2008 ते 2013 या काळात राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. यापुढे पक्षामध्ये तरुणांना महत्त्वाची भूमिका मिळेल, तर ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या अधिवेशनात सांगितले होते.
Ashok Gehlot appointed as All India Congress Committee (AICC) General Secretary In-charge, Organisation, Training, replaces Janardhan Diwedi, General Secretary, AICC (File pic) pic.twitter.com/WbBhsHlAcP
— ANI (@ANI) March 30, 2018