शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

ज्यांच्यामुळे राजस्थानात रणकंदण माजले, ते गेहलोतच काँग्रेस अध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर? मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 5:33 PM

Ashok Gehlot News: राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष होण्यावरून राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू नये यासाठी गेहलोत यांच्या ९० हून अधिक समर्थक आमदारांनी राजीनामे दिले होते. तर स्वत: गेहलोत यांनीच पायलट यांच्या नावाला काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे संमती दर्शविली होती. असे असताना आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. 

राजस्थानमधील सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस हायकमांड अशोक गेहलोत यांच्या नावावर फुली मारण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रेसमधून बाहेर पडू शकतात. आज  दिल्लीच्या १० जनपथ येथे बैठक होणार आहे. त्यापूर्वीच मोठी माहिती समोर येत आहे. केरळपासून जयपूरपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकाच स्वरात बोलू लागले आहेत. 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर पडल्याचे हे नेते बोलत आहेत. याचबरोबर ३० सप्टेंबरच्या आधी जे नेते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील त्यांनाही बाहेर केले जाणार आहे. यामुळे मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल यांची नावे चर्चेत आहेत. गेहलोत ज्या पद्धतीने वागले ते पक्ष नेतृत्वाला आवडलेले नाहीय. यामुळे हायकमांडच्या अडचणी वाढल्या आहेत, असे सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. 

राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केके वेणुगोपाल 10 जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामेश्वर दुडी हेही 10 जनपथवर आले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस