अशोक गहलोत रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणार, उद्या सोनिया गांधींची भेट घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 09:46 PM2022-09-28T21:46:51+5:302022-09-28T21:48:21+5:30

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे बुधवारी रात्री दिल्लीमध्ये दाखल होत असून ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 

Ashok Gehlot will reach Delhi late at night, will meet Sonia Gandhi tomorrow! | अशोक गहलोत रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणार, उद्या सोनिया गांधींची भेट घेणार!

अशोक गहलोत रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणार, उद्या सोनिया गांधींची भेट घेणार!

Next

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan)  आमदारांच्या बंडखोरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी  (Congress President)  निवड होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे बुधवारी रात्री दिल्लीमध्ये दाखल होत असून ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. 

अशोक गहलोत आणि  सोनिया गांधी यांची भेट काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले जात आहे. सध्या राजस्थानमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे सचिन पायलट हे कालपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे अशोक गहलोत आणि सोनिया गांधी यांच्यातील बैठकीनंतर अशोक गहलोत यांची नेमकी भूमिका काय असणार, हे स्पष्ट होईल.

दरम्यान, राजस्थानातील काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून, रणकंदनामुळे त्यांनी हायकमांडची नाराजी ओढवून घेतली आहे. आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. दुसरीकडे, कॉंग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत तर, निरिक्षकांच्या अहवालानंतर अशोक गहलोत यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे ते पुन्हा अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

अशोक गहलोत यांनी आज प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतासरा, मंत्री शांती धारीवाल, खाचरियावास यांची भेट घेतली. या भेटी घेतल्यानंतर अशोत गहलोत हे राजभवनात गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झाले नाही. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा अशोक गहलोत हे सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्या 102 आमदारांचे काय म्हणणे आहे हे सांगतील. मात्र, मुख्यमंत्री पदाचा ते राजीनामा देतील ही शक्यता खाचरियावास यांनी फेटाळून लावली आहे.

Web Title: Ashok Gehlot will reach Delhi late at night, will meet Sonia Gandhi tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.