नाशिक : अशोका ज्युनिअर कॉलेजतर्फे टॅलेंट हंट कार्यशाळेचे दि. २४ जानेवारी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत अशोका नगर परिसर या ठिकाणी आयोजित केली आहे. तसेच टॅलेंट हंट ही स्पर्धा परीक्षा ३० जानेवारीला सकाळी १० वा. आयोजित केली आहे. तसेच वेगवेगळ्या शाखांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तज्ञ लोकांनी काढल्या आहेत.अशोका एज्युकेशन फाऊंडेशन जॉईंट सेक्रेटरी श्रीकांत शुक्ल स्पर्धा परीक्षांचे पूर्वतयारी व स्पर्धा परीक्षेला सामोरे कसे जावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.जसे भीष्मराज बाम व शंतनु गुणे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.टॅलेंट हंट या परिक्षेत वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी त्याचप्रमाणे तर्कनिष्ठ प्रश्न गणित व इंग्रजी इ. विषयांवर आधारित परीक्षा असेल. इ. १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असेल. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन क्रमांकांना लॅपटॉप, टॅब, मोबाईल अशी बक्षिसे मिळतील त्याचबरोबर शिष्यवृत्ती आणि फीमध्ये ५० टक्के सवलत अशोका ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी देण्यात येईल.नाशिक शहरातील अग्रगण्य कॉलेज म्हणजे अशोका ज्युनिअर कॉलेज. ा कॉलेजचे वैशिष्ट म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असे वर्ग अेव्ही.रुम, आधुनिक सुविधायुक्त वाचनालय तसेच मूल्याधिष्ठित व सर्वांगीण विकास असलेले विद्यार्थी-विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार करून घेतले जाते. जसे की एआपीएमटी,आयआयटी,जेईई,सीए-सीपीटी इत्यादी कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेश मिळाला. दोन विद्यार्थ्यांना परदेशातील नामवंत विद्यापीठात प्रवेश मिळाला.------
अशोका कॉलेजचा स्पर्धा परिक्षांसाठी उपक्रम
By admin | Published: January 22, 2016 11:50 PM