मारियानी : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. पाचही राज्यांमध्ये अधिकाधिक यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) कंबर कसली आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचाराला वेग आला असून, भाजपचे अनेक नेते आता आसाममध्ये जाऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले. (assam assembly election 2021 bjp leader smriti irani blamed that congress is most corrupt party)
आसाममधील एका सभेला संबोधित करताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. केंद्रातील आणि राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर भारतीय जनता पक्षालाच मत द्या, असे आवाहन स्मृति इराणी यांनी यावेळी बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अशा अनेक योजना तयार केल्या आहेत, ज्याचा राज्यातील जनतेला पूरेपूर लाभ घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.
जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला
काँग्रेसने गरिबांसाठी कधीही काम केले नाही
केवळ भाजप असा पक्ष आहे, जो गरिबांच्या कल्याणासाठी कायम झटत असतो, काम करत असतो. काँग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. तो सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे, अशी टीका स्मृति इराणी यांनी केली आहे. आसाममधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करा, असे त्यांनी सांगितले. आसाममध्ये अनेक बडे काँग्रेस नेते होऊन गेले. त्यातील पंतप्रधानही झाले. मात्र, राज्याचा विकास, गरिबांचे कल्याण झाले नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात आसाममध्ये एम्स उभे राहिले, असे इराणी यांनी नमूद केले.
काँग्रेसने अजमलसोबत हातमिळवणी केली
काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यापासून पक्षाला रोखले होते. मात्र, त्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाल्यावर लगेचच काँग्रेसने अजमल यांच्या पक्षाशी युती केली, असा आरोप इराणी यांनी केल्या. आसाम विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी दिलेल्या रमानी तंती यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत स्मृति इराणी बोलत होत्या.