गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी जोर धरू लागल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत. अशातच आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनीही प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. जोरहाट येथील सभेला प्रियांका गांधी यांनी संबोधित करत केंद्र सरकार आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. (assam assembly election 2021 congress leader priyanka gandhi criticised pm narendra modi on various issues)
एरव्ही ट्विटवर सक्रीय असलेले पंतप्रधान मोदी आसाम महापुरावर काहीही बोलले नाहीत. काल त्यांचे भाषण ऐकत होते. मला वाटले की, ते आसामच्या विकासाबाबत बोलतील. आसाममधील भाजपच्या आराखड्याविषयी बोलतील. मात्र, बाकी सगळं सोडून २२ वर्षीय दिशा रवी हिच्या टूलकिटबाबत बोलले, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास
चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा डाव
आसाममधील चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मात्र, आसाममधील महापूर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पाच युवकांचा झालेला मृत्यू यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक चकार शब्द काढला नाही, अशी विचारणा प्रियांका गांधी यांनी केली आहे. भाजपकडून आश्वासन देण्यात आलेले २५ लाख रोजगार मिळाले का, सीएए लागू करणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपने सत्तेत येताच सीएए लागू केला, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च रोजी पहिला टप्पा, ०१ एप्रिल रोजी दुसरा टप्पा आणि ०६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. तर, मतमोजणी ०२ मे रोजी होणार आहे.