सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:09 IST2021-03-24T18:07:24+5:302021-03-24T18:09:37+5:30

Assam Assembly Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आसाममध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले.

assam assembly election 2021 pm narendra modi criticised that congress can do anything to be in power | सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्रसत्तेत येण्यासाठी काँग्रेस पक्ष काहीही करु शकतो - मोदीविकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल - मोदी

बिहपुरिया : आसाम विधानसभा निवडणुकांच्या (Assam Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस उरले असून, प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.  भाजप आसामचा गड वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आसाममध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाही सोबत जाऊ शकते, अशी टीका केली आहे. (assam assembly election 2021 pm narendra modi criticised that congress can do anything to be in power)

आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहपुरिया येथील लखीमपुर येथे प्रचारसभेला संबोधित केले. काँग्रेस असा पक्ष आहे, जो गरज असेल तेव्हाच विश्वासघात करतो. आसाममध्ये आपल्या कार्यकाळात काँग्रेसने केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी काम केले. सर्वसामान्यांचे कोणतही काम काँग्रेसने केले नाही. काँग्रेसचे खोटे दावे केवळ घुसखोरीला परवानगी देणारे आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. 

दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी

सत्तेत येण्यासाठी काहीही करु शकतो

काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी काहीही करु शकतो, असा निशाणा साधत आसाममधील गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साडेपाच लाख अर्ज आले आहेत. यापैकी काहींना पक्की घरे मिळाली. ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांनाही लवकरच घरे मिळतील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. 

विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल

विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल बांधले जात आहेत. तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे, असे सांगत आसामची ओळख आणि संस्कृती मिटवण्याची इच्छा असणाऱ्यांसोबत काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष मतांसाठी काहीही करू शकतो. ते कोणाही सोबत सत्तेत जातील. मात्र आसामचे लोकं त्यांची संस्कृती नष्ट होऊ देणार नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

दरम्यान, गेली ५ वर्षे भाजपचे सरकार आसाममध्ये आहे. भाजपकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडूनही जोरात प्रचार केला जात आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: assam assembly election 2021 pm narendra modi criticised that congress can do anything to be in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.