Assam Election Results 2021 Updates: आसामसहित पाच राज्यांच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून २९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडी १९ जागांवर पुढे आहे. दुसरीकडे आसामन जातीय परिषद (AJP) तीन जागांवर बपुढे आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पोस्टल बॅलेट उघडण्यात आले आहेत. सध्या राज्यात ३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरु असून मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. Assam Election Results 2021 Updates: Will BJP retain power in Assamसध्या भाजपकडून आपली सत्ता कायम राखण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रचारात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. यापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या विजयाचं भाकित करण्यात आलं होतं. Assam Election Results 2021 Live Updates: Counting of votes begins; BJP looks to create history by winning consecutive terms
Assam Assembly Election Results 2021 : आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 9:19 AM
Assam Election Results 2021 Updates: Will BJP retain power in Assam: आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात. ३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरू
ठळक मुद्देआसाममध्ये मतमोजणीला सुरूवात.३३१ केंद्रांवर मतमोजणी सुरू