'काँग्रेसचा आत्मा मेला, पक्ष नक्षलवादी झाला', सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:16 PM2024-01-25T16:16:40+5:302024-01-25T16:17:40+5:30
'आगामी लोकसभेत मतदार काँग्रेसला त्यांचे अहंकाराचे उत्तर देणार.'
Himanta Biswa Sarma vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा असाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. यानंतर, असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी(25 जानेवारी) या यात्रेवर जोरदार हल्लाबोल केला. यावेली त्यांनी यात्रेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर जातीय संघर्ष भडकवण्याचा आरोप केला.
राहुल गांधी सुन लीजिए, आपने जिस तरह असम का अपमान किया है, आपको असम में लोकसभा चुनाव में 2019 से भी कम सीट मिलने वाली हैं।
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 25, 2024
मैं इस यात्रा से जुड़े कुछ खुलासे कर रहा हूँ:
👉 माँ कामाख्या मंदिर में दर्शन की तैयारी पूर्ण होने के बाद वहाँ दर्शन करने के लिए नहीं गए।
👉 बटद्रवा थान… pic.twitter.com/7GPyH7C1X8
मतदार उत्तर देणार
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, काँग्रेसचा आत्मा मारला गेला आहे. सर्वात जुना पक्ष गांधीवादी तत्त्वज्ञानापासून दूर गेला असून आता सॉफ्ट नक्षलवादी बनला आहे. गुवाहाटीमध्ये आम्हाला याची झलक पाहायला मिळाली. राम मंदिराच्या अभिषेकावेळी राज्यात संघर्ष झाला, पण आमच्या पक्षाच्या लोकांनी आणि रामभक्तांनी स्वतःला ताब्यात ठेवले आणि राज्यात अनुचित प्रकार घडू दिला नाही. आसामची जनता लोकसभा निवडणुकीत तुमच्या अहंकाराला नक्की उत्तर देईल, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
इंडिया टुडे ने एक बहुत बड़ा खुलासा किया है कि राहुल गांधी अपनी बस यात्रा में “body double” का प्रयोग कर रहे थे। इसका मतलब बस में जो व्यक्ति बैठे थे और खिड़की से लोगों को देख रहे थे, वो शायद राहुल गांधी थे ही नहीं।#PressConferenceHighlightspic.twitter.com/b4dPckT4VV
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 25, 2024
राहुल गांधींचा ड्युप्लिकेट?
यावेळी सरमा यांनी एक मोठा दावा केला. राहुल गांधी त्यांच्या यात्रेत “बॉडी डबल”(ड्युप्लेकेट) वापरतात. याचाच अर्थ बसमध्ये बसून खिडकीतून लोकांकडे पाहणारी व्यक्ती बहुधा राहुल गांधी नसावी, असा दावा त्यांनी केला. तसेच, आई कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाची तयारी पूर्ण केल्यानंतरही त्यांनी देवीचे दर्शन घेतले नाही. बाटद्रवा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी 2 तास थांबू शकलो नाही. लचित बारफुकन आणि भूपेन हजारिका यांच्या समाधीजवळून गेले, पण अभिवादन केले नाही. बारपेटा येथील प्रसिद्ध सत्रा आणि धुब्रीच्या ऐतिहासिक गुरुद्वाराला भेट दिली नाही. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवानंतर आसाममधील पवित्र स्थळांना भेटी न देऊन दंगली घडवण्याचा त्यांचा कट होता का? असा सवालही त्यांनी केला.
कांग्रेस देश की मीडिया को एक झूठ फैला रहा है की राहुल गाँधी को बटद्रवा थान में जाने से रोका गया लेकिन सच ये है की उनको अंदर जाना ही नहीं था।
राहुल गांधी ने कुछ घंटे रुकने से माना कर दिया और थान के नियम के अनुसार, उनको पारंपरिक कपड़े में आना चाहिए था लेकिन वह T-Shirt में आ गये। pic.twitter.com/dTrNsmFgvh— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 25, 2024
राहुल गांधींना अटक होणार
दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (24 जानेवारी) राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, अशी माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही राहुल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. विशेष तपास पथक तपास करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना अटक केली जाईल. भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसाचार भडकवल्याबद्दल राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.