आसाममधीलपूरस्थिती गंभीर झाली आहे. 24 जिल्ह्यांतील तब्बल 25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. गावे पाण्याखाली गेली असून आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे पुरासंबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा 84 पर्यंत वाढला आहे. तर राज्यातील पूर आणि भूस्खलनमुळे मृतांची संख्या ही 110 पर्यंत पोहोचली आहे.
आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 24 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामध्ये सर्वाधित 4.53 लाख लोक हे गोलपाडामधील आहेत. तसेच बारपेटामध्ये 3.44 लाख लोक आणि मोरीगावातील 3.41 लाखांहून अधिक लोकांनाही पुराचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. काझीरंगा अभयारण्यातील 108 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नागरिकांना आतापर्यंत राज्य सरकारकडून 99 हजार 176 क्विंटल तांदूळ, 19 हजार 397 क्विंटल डाळ आणि 1 लाख 73 हजार लीटर मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे. सर्व मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. राज्यातल्या 30 जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. 167 पूल, 1600 पेक्षा अधिक रस्त्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती
'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल