शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

Assam Flood: आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, काँग्रेसचा केंद्रावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 4:06 PM

Assam Flood: राज्यातील 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.

Death In Assam Flood: आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून साडे 7 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 25 लोकांपैकी 20 लोक पुरामुळे तर 5 लोकांचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे. शेजारील राज्यांनाही पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे. 

काँग्रेसचा केंद्रावर आरोप 

रिपोर्टनुसार, राज्यातील नागाव परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 3.5 लाख लोक संकटाचा सामना करत आहेत. सध्या राज्यात 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दरम्यान, या परिस्थितीवरुन काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. भाजप सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मिळणाऱ्या मदत रकमेपासून आसामला वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

आसामला निधीपासून वंचित ठेवलेआसाममध्ये काँग्रेस नेते मनजीत महंता यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, एनडीआरएफ अंतर्गत गुजरातला 2021-22 मध्ये एक हजार कोटी रुपये मिळाले, पण आसामला एक पैसाही दिला गेला नाही. भाजपच्या कार्यकाळात 2018-19 आणि 2019-20 या वर्षात केंद्राकडून आसामला काहीही दिले गेले नाही. 2020-21 मध्ये आसामला केवळ 44.37 कोटी रुपये मिळाले, अशी टीका त्यांनी केली. 

रेल्वेनेही गाड्या रद्द केल्या आसाममध्ये संततधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेने राज्यातील गाड्या रद्द केल्या आहेत. आसाममध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वेने जून महिन्यापर्यंत गाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग विभागात पाणी साचल्याने आणि दरड कोसळल्यामुळेही हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या शेजारील राज्यांतील रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे तुटला आहे.

 

टॅग्स :Assamआसामfloodपूरlandslidesभूस्खलनcongressकाँग्रेसBJPभाजपा