नवी दिल्ली : आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच परिस्थिती आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया या 17 भागातील 229 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.
एएसडीएमएने सांगितले की, पुरामुळे जवळपास 1,007 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे आणि सुमारे 16,500 घरगुती प्राणी आणि कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्या सोनीतपूर आणि नेमाटिघाट (जोरहाट) मधील अनुक्रमे जीया भरली आणि ब्रह्मपुत्र या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.
दरम्यान, सोमवारी अरुणाचल प्रदेशमधील दिबांग घाटी जिल्ह्यातील आरजू गावात भूस्खलन झाल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत नुकसान झाले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आसाम आणि मेघालयात 26 आणि 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करणार्या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील काही दिवस तीन राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
आणखी बातम्या...
ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा
CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का