दुधासारखी स्वच्छता भाजपातून आली, कलंकित नेतेही फुलले...', काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:42 AM2023-04-15T11:42:18+5:302023-04-15T11:43:53+5:30

आसाममधील बिहू या विशेष उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुवाहाटी येथे पोहोचले आहेत.

assam guwahati nirma girl poster of bjp leader congress attack on pm tour | दुधासारखी स्वच्छता भाजपातून आली, कलंकित नेतेही फुलले...', काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

दुधासारखी स्वच्छता भाजपातून आली, कलंकित नेतेही फुलले...', काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर आहेत.  आसाममधील बिहू या विशेष उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी एम्स गुवाहाटीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी काँग्रेसने पोस्टर लावून टीका केल्याचे समोर आले.

“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक

या दरम्यान, गुवाहाटीमध्ये सीएम हिमंता बिस्वा सरमा, नारायण राणे, शुभेंदू अधिकारी, सुजाना चौधरी, ईश्वरप्पा यांसारख्या भाजप नेत्यांचे इडीट केलेले एक पोस्टर दिसले. यात 'निरमा गर्ल' ही दिसत होती.  पोस्टरमध्ये दिसत असलेले नेते इतर पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. 

गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. आसाम दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी नलबारी, नागाव आणि कोक्राझार येथील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. तर दुसरीकडे 'निरमा वाल्या पोस्टर'मुळे राजकीय चर्चा वाढली. याआधी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर वॉशिंग पावडरच्या जाहिरातीचे ग्राफिक पोस्ट केले होते, ज्यामध्ये 'भाजप से दूध जैसा शुभ्रता, कलंकित नेते भी फुलते' असे कॅप्शन दिले होते.

जुन्या वॉशिंग पावडरच्या जाहिरातीतील 'कॅचफ्रेज'वर स्किट करत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, भाजपची राज्य सरकारे म्हणजे 'डबल वॉशिंग मशिन'शिवाय दुसरे काही नाही, जिथे 'भूतकाळातील पापे' धुतली जातात. यापूर्वी ३० मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनीही भाजपला 'वॉशिंग मशीन' म्हटले होते. मेघालयमध्ये संगमा सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसने भाजपला घेराव घातला होता. काँग्रेसने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी भाजप हायकमांडने संगमा सरकारला 'सर्वात भ्रष्ट' मानले होते आणि आता पक्ष त्यांच्याशी हातमिळवणी करत आहे.

एम्स गुवाहाटी ११२३ कोटी रुपये खर्चून बांधले

पीएम मोदींनी त्यांच्या आसाम दौऱ्यावर गुवाहाटीच्या एम्सच्या १ हजार १२३ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करताना, राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी १.१ कोटी आयुष्मान कार्ड वितरित करण्याचा उपक्रम जाहीर केला. सरमा म्हणाले की, येत्या दीड महिन्यात ही संख्या ३.३ कोटी होईल आणि लाभार्थी या कार्डांच्या मदतीने पाच लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य सेवा वैद्यकीय उपचार लाभ घेऊ शकतील.

Web Title: assam guwahati nirma girl poster of bjp leader congress attack on pm tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.