शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

मी हरले होते... कुणीच मदतीला आलं नाही...; सासऱ्यांना पाठीवरून रुग्णालयात नेणाऱ्या सुनेची मन सुन्न करणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 6:00 PM

आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठिवरून रुग्णालयात घेऊन जातानाचे एका सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लोक याला प्रेरणादायी म्हणून कौतुक करत आहेत. पण, या फोटो मागची खरी कहाणी काही वेगळीच आहे.

ठळक मुद्दे 'अशक्तपणा एवढा होता, की माझ्या सासऱ्यांना उभंही राहता येत नव्हतं''लोग फक्त बघत होते मात्र, मदतीसाठी कुणीच आलं नाही'...तेव्हा सासऱ्यांनी विचारलं, तुझ्यात एवढी हिंमत कुठून आली...?

आपल्या कोरोना पॉझिटिव्ह सासऱ्यांना पाठिवरून रुग्णालयात घेऊन जातानाचे एका सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लोक याला प्रेरणादायी म्हणून कौतुक करत आहेत. पण, या फोटो मागची खरी कहाणी काही वेगळीच आहे. आसाममधील राहा येथील रहिवासी असलेली निहारिका दास यांच्या मदतीसाठी कुणीच येत नव्हते, म्हणून त्यांना आपल्या वृद्ध सासऱ्यांना अशा पद्धतीने पाठीवर बसवून नेण्याची वेळ आली. निहारिका यांच्या घराकडे जाणारा रस्ताही अत्यंत खराब आहे. यामुळे रुग्णालयात जाण्यासाठी बोलावलेली गाडीही त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नव्हती. भलेही या फोटोत दिसत नसेल, पण, निहारिका यांना त्यावेळी अत्यंत एकटे आणि हरल्यासारखे वाटत होते. (A heart-wrenching story of a daughter-in-law carrying her father-in-law on her back to the hospital) 

 'अशक्तपणा एवढा होता, की माझ्या सासऱ्यांना उभंही राहता येत नव्हतं'निहारिका दास यांनी सांगितले, की 2 जून रोजी त्यांचे 75 वर्षीय सासरे थुलेश्वर दास यांची प्रकृती खालावली. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती. यानंतर निहारिका यांनी नजीकच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मागवली. मात्र, रस्ता अत्यंत खराब असल्याने ती त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत नव्हती. निहारिका यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, की 'माझे सासरे एवढे अशक्त झाले होते, की त्यांना उभेही राहता येत नव्हते. माझे पती सिलीगुडी येथे काम करतात, यामुळे मझ्याकडे त्यांना पाठीवर बसवून ऑटोपर्यंत नेण्याशिवाय पर्याय नव्हता.'

'लोग फक्त बघत होते मात्र, मदतीसाठी कुणीच आलं नाही'थुलेश्वर दास यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निहारिका यांना, त्यांना कोरोना रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. हे कोरोना रुग्णालय त्यांच्या घरापासून 21 किमी दूर होते. निहारिका यांनी सांगितले, की 'आम्ही दुसरी खासगी गाडी मागवली. तेथे रुग्णवाहिका अथवा स्ट्रेचर नव्हते. यामुळे मला त्यांना आपल्या पाठीवर घेऊनच कॅबपर्यंत जावे लागले. लोक आम्हाला लांबूनच पाहत होते. पण मदतीसाठी कुणीही समोर आलं नाही.' याचवेळी कोणीतरी त्याचे फोटो क्लिक केले, तेच व्हायरल होत आहेत. 

निहारिका यांनी सांगितले, की त्यावेळी त्यांचे सासरे जवळपास बेशुद्धावस्थेतच होते. यामुळे त्यांना घेऊन जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक शक्तीची आवश्यकता होती. मात्र, कोरोना रुग्णालयात पोहोचल्यानंतर थुलेश्वर यांची प्रकृती पाहताच त्यांना नगाव सिव्हिल रुग्णालयात रेफर करण्यात आले आणि निहारिका यांना पुन्हा एकदा आपल्या सासऱ्यांना पाठीवर बसवून घेऊन जावे लागले.

'सासरे विचारत होते, माझ्यात एवढी हिंमत कुठून आली?' -निहारिका यांनी सांगितले, की 'यावेळी मी मदत मागितली, पण काहीही उपयोग झाला नाही. त्या दिवशी मी कदाचित असेच 2 किमी चालली असेल. नंतर निहारिका यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला. निहारिका म्हणतात, 'मला एवढेच सांगायचे आहे, की लोकांनी एकमेकांच्या मदतीसाठी पुढे यायला हवे. मग समोरचे आपले पालक असोत, सासू-सासरे असोत किंवा कुणी परके असोत. फोटोत कदाचित दिसले नसेल, पण त्यावेळी मला प्रचंड एकटे आणि हरल्यासारखे वाटत होते.' 

यानंतर 5 जूनला थुलेश्वर यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तेथे सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले.  निहारिका सांगतात, 'माझे सासरे जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा मी त्यांना आमचे व्हायरल फोटो दाखवले. मी त्यांना म्हणाले, लोक आपले कौतुक करत आहेत. यावर ते म्हणाले, मला पाठीवर बसविण्याची ताकद तुझ्यात कशी आली?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssamआसामhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर