दरांग:आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुती येथे गुरुवारी पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. या चकमकीत किमान दोन आंदोलकांचा मृत्यू झाला तर 9 पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे. अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी
मिळालेल्या माहितीनुसार, आसाम सरकारनं दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुटी गावात सोमवारी मोठ्या प्रमाणात अतिक्रम हटाव मोहीम राबवली. यामुळे 800 कुटुंबे बेघर झाली. या कारवाईदरम्यान स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सरकार दावा आहे की, हे लोक पूर्व बंगालचे मुसलमान असून, या गावात अतिक्रम करुन राहत होते. पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 9 पोलिस जखमी झाले असून 2 आंदोलकांचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचे एसपी सुशांत बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली.
इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी
पहिली मोहीम जूनमध्ये सुरू करण्यात आलीयापूर्वी, जून महिन्यात पहिली अतिक्रमविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळेस 49 मुस्लिम आणि एक हिंदू कुटुंब बेघर झालं होतं. त्यानंतर सोमवारी राबवलेल्या मोहिमेत 800 कुटुंबे बेघर झाली आहेत. पणष धोलपूर गोरखुतीमधील काही रहिवाशांच्या मते बेघर झालेल्या कुटुंबांची संख्या 900 पेक्षा जास्त आहे, तर बाधित लोकांची संख्या किमान 20,000 आहे.