आसाम मध्ये लोकसभेच्या १४ जागांपैकी १० जागा जिंकून भाजप प्रणित ‘एनडीए’ने बाजी मारली. गेल्या निवडणुकीत या पक्षाचे ७ खासदार जनतेने निवडून दिले. यंदा कॉँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. २०१४ मध्ये या पक्षाचे ३ उमेदवार संसदेवर गेले होते. ‘ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट’ (एआययूडीएफ) सह अन्य पक्षांना ३ ठिकाणी विजय मिळाला. कोकझार, करीमगंज, सिल्चर येथे अन्य पक्षीयांना यश मिळाले. तर कालियाब्रेर येथेच कॉँग्रेसचा जोर होता. आसाम गण परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट या प्रमुख प्रादेशिक पक्षांसोबत भाजपने आघाडी केली होती, ती फळाला आली.
आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:55 IST