गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे इशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेल्या पुरस्थितीने अजून गंभीर स्वरुप धारण केले आहे. आसाममध्ये शनिवारी पूराच्या पाण्यात बुडून चार जण व दरड कोसळल्यामुळे एक जण मरण पावला. त्यामुळे या तीन राज्यांत पुरामुळे बुधवारपासून बळी गेलेल्यांची संख्या आता २४ झाली.आसाममधील आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४,२५,३७३ लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. कचर जिल्ह्यातील दोन तसेच हैलाकंडी, होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरबळी ठरली आहे. अर्धा हैलाकंडी जिल्हा पूरग्रस्त आहे. इदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी घराच्या गच्चीवर जाऊन नमाज पढला. जिल्ह्यातील ३३१ पैैकी २३१ गावांना पुराने वेढले आहे. कटखल, धोलेश्वरी, बाराक या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.>त्रिपुराचा देशाशीअसलेला संपर्क तुटलात्रिपुरातील धरमनगर भागात दरडी कोसळल्याने या राज्याचा देशाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे. या भागातूनच राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्ग जातो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांनी राज्यातील पूरग्रस्त उदयपूर भागाला भेट दिली. पूरग्रस्त भागांमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला.वाहतूक कोलमडलीमणिपूर व आसामला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ व २ येथे पुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी तासनतास वाहने खोळंबून राहिल्याचेचित्र आहे. दरम्यान उचिवा व अन्य काही गावांना रविवारी पुराच्या पाण्याने वेढले आहे. मात्र इंफाळ शहर व परिसरात पुरामुळे बिघडलेल्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे.> ५४,३६४ पूरग्रस्तांसाठी ८७ मदतशिबीरेहैलाकंडी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ८७ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात सध्या ५४,३६४ पूरग्रस्त राहात आहेत. आपत्कालीन मदत दलाने पुराच्या पाण्यात बुडणाºया ३१६ जणांचे प्राण वाचविले आहेत. आसामच्या अन्य सहा जिल्ह्यांत १०४ मदतशिबीरे सुरु करण्यात आली असून त्यात ४५,६४६ पूरग्रस्त सध्या राहात आहेत. दिमा हसाव या जिल्ह्यात पावसामुळे माहुर, हरंगजाव, मैैलबंग या ठिकाणी दरडी कोसळल्या तसेच ११४ घरांची पडझड असून लुमडिंग ते बदरपूर दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
आसाम, मणिपूर, त्रिपुरामध्ये पूरस्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:59 AM